पर्यवेक्षकामुळे हक्काचे वेतन मालकाने रखडवल्याच्या रागातून दोघा कामगारांनी दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने पर्यवेक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. मृत तरुणाच्या शेवटच्या कॉल नोंदीमुळे पोलिस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले व हत्येचा उलगडा झाला.
कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा येथे राहणारा हर्षद श्रीरंग दुगड हा एका खासगी कंपनीच्या शाखेत पर्यवेक्षक पदावर काम करत होता. ३ ऑगस्ट रोजी हर्षदच्या कुटुंबीयांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात हर्षद बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. बेपत्ता झाल्याच्या तक्रारीसोबत कुटुंबीयांनी पोलिसांना एक कॉल रेकॉर्डिंग दिले. या रेकॉर्डिंगमध्ये हर्षद गोपी गोपी असे ओरडताना ऐकू आले. त्यानंतर त्याचा मोबाइल बंद झाला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. हर्षद हा गोपी नावाच्या कामगारासोबत फिरताना दिसला होता. पोलिसांनी गोपीचा शोध सुरू केला. मुंबई, ठाणे, नाशिक, जालना या शहरांत गोपीचा शोध घेत असताना दुसरीकडे हर्षदचा शोधसुद्धा सुरू होता. कॉल रेकॉर्डिंगमुळे पोलिसांना हर्षदची हत्या झाली असावी आणि तो शेवटी वाडेघर परिसरात दिसल्याने त्याचा मृतदेह वाडेघर परिसरात टाकला असावा, असा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला.
पर्यवेक्षकाची हत्या