चोर समजून एका ४८ वर्षांच्या बेघर गृहस्थाला जमावाने बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. कल्याणमध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या सीसीटीव्ही फुटेजवरून कल्याण पोलिसांनी पाच जणांना अटक केली, तर सहाव्या आरोपीचा शोध सुरू आहे.
कल्याण रेल्वे स्थानकालगत महालक्ष्मी हॉटेलजवळ रस्त्याकडेला एक मृतदेह आढळला होता. यासंदर्भात पोलीस करत असलेल्या तपासात हा झुंडबळी असल्याचे निष्पन्न झाले. जोंगल लोहरा असे या दुर्दैवी गृहस्थाचे नाव असून तो झारखंडचा रहिवासी होता. राहायला घर नव्हतं, म्हणून तो रस्त्याकडेला राहायचा.
चौकशीत असे आढळले की मंगळवारी पहाटे भाजीविक्रेत्या महिलेने जोंगलला पाहिले आणि आरडाओरडा केला. कदाचित तो तिला चोर वाटला असावा. आरोपींपैकी एक जण तिथे होता, त्याने जोंगलला पकडलं आणि काठीने मारू लागला. नंतर दुसऱ्या आरोपीने त्याचे हातपाय बांधले आणि त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो ठार झाला. त्याचा मृतदेह तसाच टाकून आरोपी तेथून पसार झाले.
जमावाकडून मारहाण